मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील*  *पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार*  *सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही*  *महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून*  *स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी*
1 min read

मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील* *पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार* *सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही* *महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून* *स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी*

Loading

*मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील*

*पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार*

*सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही*

*महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून*

*स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी*

मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील पुनर्विकास अनेक कारणांमुळे रखडला जातो. त्यामुळे या कलेक्टर जमिनीवरील घरांसाठी लवकरच एक खिडकी योजना कार्यान्वित करू, अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर मुंबई बँकेच्या पुढाकाराने होत असलेल्या स्वयंपुनर्विकास योजनेला दीड हजार कोटी रूपये देणार असल्याची घोषणा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केली.

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकास योजनेसंदर्भात आज मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली सरकारची नोडल एजन्सी असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची बैठक पार पडली. या बैठकीला शासनाच्या वित्त, गृहनिर्माण आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहकार राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले कि, स्वयंपुनर्विकास योजनेकडे गृहनिर्माण संस्थांचा कल हळूहळू वाढतोय. जवळपास २१८ कोटींचे कर्ज मुंबई बँकेकडून या प्रकल्पासाठी देण्यात आलेय. पण त्यांचीही मर्यादा आहे. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेय. मुंबई बँकेकडे स्वयंपुनर्विकासासाठी १६०० प्रस्ताव आलेत. यासाठी राज्य सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले असून इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सहकार्य मिळाले तर मोठी मदत गृहनिर्माण सहकारी संस्थांना होईल. १६०० प्रस्तावांपैकी कमीतकमी एक हजार प्रस्ताव आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने निकाली निघाले पाहिजेत. जेणेकरून पंतप्रधान मोदींचे जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरताना दिसेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल.

तर यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले कि, जिल्हा आणि राज्य बँकांना रिझर्व्ह बँकेने लिमिट दिले आहे. एकंदर कर्जाच्या ५ टक्के मर्यादेपर्यंत हौसिंगला पुनर्विकासासाठी कर्जपुरवठा करता येतो. मुंबई जिल्हा बँकेला अनुभव आहे. स्वयंपुनर्विकासासाठी १६०० प्रस्ताव त्यांच्याकडे आलेत. या योजनेसाठी राज्य बँक दीड हजार कोटी देणार आहे. भविष्यात मुंबई, ठाण्यातून जितके अर्ज येतील ते सर्व अर्ज निकाली काढण्याची क्षमता आमच्यात असावी. यासाठी सगळ्या बँकांना एकत्र करून त्यांची लीडरशिप मुंबई बँकेने करावी, अशी आमची भुमिका आहे.

तर आमदार प्रविण दरेकर म्हणाले कि, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास सुरू आहे. त्याला ताकद, गती देणे व अर्थपूरवठा करणे याकरिता घेतलेली बैठक फलदायी झाली. सहकार मंत्र्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून या योजनेला सहकार्य करण्याचे मान्य केलेय. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याने एक हजार हौसिंग सोसायट्यांचे प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी शासन सर्वतोपरी पाठीशी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी दिल्याचे दरेकरांनी म्हटले.

तसेच राज्याचे नेतृत्व करणारी जी शिखर बँक आहे त्या राज्य सहकारी बँकेने दीड हजार कोटी रुपये स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेच्या पुढाकाराने होत असलेल्या या योजनेसाठी देऊ असे आश्वासन दिलेय. त्याकरिता विद्याधर अनास्कर यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन्म दिलेली ही स्वयंपुनर्विकास योजना आहे. ती सशक्त होणे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील, बॅंकिंग सेक्टरमधली लोकं या योजनेसाठी पुढे येताहेत. हीच या योजनेची यशस्वीता असून घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शिवधनुष्य उचलले आहे त्याला गती मिळताना दिसतेय. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच मंत्री पंकज भोयर यांनी आम्ही जे सहकार भवन उभारणार आहोत त्यासाठी ५० कोटीचा निधी देण्यासाठी सरकारकडे मागणी करू असा शब्द दिला असल्याचेही दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *