हितेश बाविस्करने छत्रपती शाहू महाराज गुणवत्ताअवॉर्ड
1 min read

हितेश बाविस्करने छत्रपती शाहू महाराज गुणवत्ताअवॉर्ड

Loading

हितेश बाविस्करने छत्रपती शाहू महाराज गुणवत्ताअवॉर्ड

अमळनेर प्रतिनिधी – न्यू इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी येथील 10 वीचा विद्यार्थी हितेश उत्तम बाविस्कर याने ग्रामीण भागातील छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारात सन-2022-24 मध्ये प्रथम पुरस्कार मिळवून विद्यालयाचा मान उंचावला आहे. या याव्यतिरिक्त, हितेशला रोख रक्कम रुपये 5000 मिळणार आहे, जी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सा जळगांव यांच्या वतीने थेट त्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
हितेशच्या यशामागे मुख्याध्यापक श्री. राकेश पवार सर, श्री. पी. व्ही. साळुंखे सर, श्री. एन. बी. गर्मा सर, श्री. आर. टी. बागुल सर, आणि श्रीमती प्रतिभा सोनवणे मॅडम यांचे अतुलनीय मार्गदर्शन आहे. तसेच, श्री. महेंद्र पारील सर आणि श्री. सुरेश वाडीले सर यांनी त्याला मौलिक मार्गदर्शन केले, ज्यामुळे त्याच्या अभ्यासात अधिक उंची गाठली.
हितेशचा हा यशस्वी प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, आणि या यशामुळे विद्यालयाचा अभिमान वाढवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *