संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका – प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील
1 min read

संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका – प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील

Loading

संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका – प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील

अमळनेर प्रतिनिधी
संपत्तीचे आणि उत्पादन साधनांचे एकत्रीकरण होऊन, सामूहिक हितास बाधा येईल अशा प्रकारे आर्थिक यंत्रणा राबविता कामा नये .एकाच व्यक्तीच्या किंवा मूठभर उद्योगपतींच्या हाती सर्व साधने असू नये .जागतिक विषमते बाबतच्या 2023 च्या अहवालात भारतात 5 टक्के श्रीमंत व्यक्तींकडे 60 टक्के हून अधिक संपत्ती आहे .संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका आहे ,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लीलाधर पाटील यांनी वक्त्यांच्या कार्यशाळेत बोलताना केले .
अध्यक्ष स्थानी केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे होते .
घरघर संविधान या शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यघटने बाबत जागृतता, संविधानाची मूल्ये, घटनात्मक अधिकार व कर्तव्य, सर्व विद्यार्थी व नागरिकांना ज्ञात व्हावी यासाठी गट शिक्षणाधिकारी प.स. अमळनेर श्री रावसाहेब पाटील यांनी प्राथमिक शिक्षण विभाग व युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर तर्फे संविधान या विषयावर वक्त्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी मा.मुख्यमंत्री, युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक ,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रा अशोक पवार यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचे कार्य विषद केले. व उपस्थित शिक्षकांनी 24 जानेवारी 25 रोजी सर्व शाळांमध्ये संविधानाविषयी माहिती द्यावी असे आवाहन केले याप्रसंगी प्रा प्रा डॉ राहुल निकम यांनी संविधानावर तयार केलेले वाचन साहित्य देण्यात आले. डी ए पाटील यांनी उद्देशिकेचे वाचन करून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. विचार पिठावर केंद्रप्रमुख राजेंद्र गवते व योगेश नानाभाऊ पाटील उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी बी ए चे प्राचार्य देवरे, आनंद कोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *