गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथे हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन..*
![]()
*गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथे हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन..*
—————————————
“*जुळवू अभ्यासासोबत क्रीडांचा मेळ..*
*लावू स्वतःला यशस्वी जीवनाचे वेड..*” या विचाराने प्रेरित होऊन..
छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित *गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड* येथे दि.20 व 21 जानेवारी 2025 या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व त्यासोबत शारीरिक व मानसिक विकास महत्वाचा असतो. वर्षभर अध्ययनातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधला जातो परंतु विद्यार्थ्यांना विविध क्रीडा गुण अवगत व्हावेत त्याचप्रमाणे त्यांचा शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळेत हिवाळ्यात सालाबादप्रमाणे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या दोन दिवसात विद्यार्थ्यांकडून तेरा प्रकारचे विविध मैदानी खेळ खेळले जातील.
सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत *”शेतकरी जगाचा पोशिंदा”* या विषयावर यश प्राप्त करणारी शाळेतील इ.9वीची विद्यार्थिनी *कु.अक्षदा शांताराम पाटील* हिच्या हस्ते केले गेले. *अक्षदा पाटील* चे *कृषिभूषण साहेबराव पाटील* यांनी रोख 500 रु,गजानन महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सदर क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केलेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार *दादासो कृषीभूषण साहेबराव पाटील* होते. त्यांच्यासमवेत माजी सरपंच *हरी पाटील*, *मधुकर पाटील अरुण पाटील*,*निळकंठ पाटील, गोकुळ पाटील, नितीन पाटील, निखिल पाटील, राकेश पाटील, मयूर पाटील* आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले.


