सततच्या अपघातांमुळे उड्डाणपुलाची गरज, आमदार कृषीभूषण पाटीलांची मागणी! धुळे – पारोळा – एरंडोल जळगाव महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी!
![]()
सततच्या अपघातांमुळे उड्डाणपुलाची गरज, आमदार कृषीभूषण पाटीलांची मागणी!
धुळे – पारोळा – एरंडोल जळगाव महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
राज्यमार्ग क्र. ३९ च्या कि.मी. २१/४०० वरील जंक्शनवर उड्डाणपुल बांधण्यासाठी मा. आमदार साहेबराव पाटील यांनी पत्रद्वारे मागणी केली आहे. धुळे जिल्ह्यातील पारोळा व एरंडोल तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे पारोळा एरंडोल – जळगाव राष्ट्रीय महामार्गावर, या जंक्शनवर वारंवार अपघात होण्याची गंभीर घटना घडली आहे.
सदरील क्रॉसींग एकाच भू-पातळीवर असल्याने, ग्रामीण भागातील वाहनधारक, विद्यार्थी व अन्य नागरीकांना राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग समजणे कठीण जात आहे. या अपघातांच्या घडामोडींमुळे मोठ्या प्रमाणावर “जिवीतहानी व वित्तहानी” होऊन काही नागरिकांना अपंगत्वास सामोरे जावे लागले आहे.
त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणांना पत्र पाठवून मागणी केली आहे. त्यात त्यांनी निर्देशित केले आहे की, धरणगाव राजवड पारोळा हा रस्ता राज्यमार्ग क्र. ३९ वर येत असल्यामुळे अपघात विरहित बांधकामाची योजना अत्यंत गरजेची आहे.
याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करणाऱ्या पत्रात निम्नलिखित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे:
1. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, जळगाव
2. मुख्य अभियंता, सा.बा. प्रादेशिक विभाग, नाशिक
3. अधीक्षक अभियंता, सा.बा. मंडळ, जळगाव
4. कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग, अमळनेर
सदर पत्राच्या माध्यमातून कार्यवाही लवकरात लवकर होऊन अपघातांची समस्या लक्षात घ्यावी , अशी अपेक्षा मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व्यक्त केली आहे.

