जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!”
![]()
“जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे आयोजित “सन्मान नारी शक्तिचा” कार्यक्रमात जिजाऊ जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत लोणच्या आयोजित महीला सभेत सरपंच शशिकांत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील उपस्थित होते.
राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरपंच डॉ. शशिकांत पाटील यांनी लोकशाही शासन प्रणालीतील अधिकार व कर्तव्य याबद्दल माहिती दिली, आणि ग्रामस्थांना स्वच्छता आणि नोंदणीवर लक्ष देण्यासाठी प्रेरित केले.
प्रमुख पाहुणे अशोक पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची प्रशंसा केली. १४ माताभगिनींचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमाने सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात महिलांच्या कार्याची दखल घेतली गेली.
गावातील तरूणींना प्रेरित करणारा हा कार्यक्रम असून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यास धारणा घेण्यात आली.
सूत्रसंचालन निरंक पाटील यांनी केले, तर आभार हिमानी पाटील यांनी मानले. या सोहळ्यात गावातील महिलांची मोठी उपस्थिती होती.

