विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप
![]()
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव गांधली नुकतेच पार पडले .
शिबीर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी , समाजकार्य महाविद्यालय अमळनेर डॉ.महेश पाटील , विशेष अतिथी सरपंच गांधली नरेंद्र शिवाजीराव पाटील, विभाग प्रमुख प्रा.डाॅ.जगदीश सोनवणे ,गावातील ज्येष्ठ नागरिक एम जे पाटील, रघुनाथ पाटील,युवराज आबा, गावातील आशाताई, दत्त मंदिर संस्थान चे संचालक, माजी पोलिस पाटील प्रताप संदांशिव,डॉ कुंदन पाटील आणि ग्रामस्थ यांची उपस्थीती होती. सुरवातीस सामूहिकपणे जिजाऊ जयंती निमीत्त जिजाऊ वंदना सामुहिक पने घेणेत आली. जिजाऊ माँ साहेब आणि युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिबीर कार्य अहवाल वाचन, प्रस्तावना एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ अनिता खेडकर, प्रा विजयकुमार वाघमारे यांनी विशद केला.
विद्यार्थ्यानी सहभागी ग्रामीण अध्ययन व सुक्ष्म नियोजन तंत्राद्वारे केलेल्या गाव अभ्यासाचे सादरीकरण केले. सरपंच नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिबीर कालावधी दरम्यान श्रमदान, बालविवाह मुक्त भारत अभियान पथनाट्य,गाव अभ्यास, मशाल फेरी, शेतकरी सहायता कार्यशाळा व मान्यवरांचे मार्गदर्शन पर व्याख्याने झाली .
समारोप प्रसंगी समाधान मैराले, सुरेश कांबळे, नूर खान, प्रवीण बैसाने, आत्माराम अहिरे या माध्यम प्रतिनीधी सह गौतम सपकाळे यांनी सदिच्छा भेट दिली.
खासदार स्मिता वाघ यांनी शिबिरास भेट दिली. त्यांनी संविधान अमृत महोत्सव पर्व यावर मार्गदर्शन केले.
मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सामुहिक पने संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.विजयकुमार वाघमारे, डॉ अनिता खेडकर,प्रा.डि आर ढगे, प्रा.डॉ.सागरराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक सागर कोळी, सारंग पाटील व आभार किर्ती सोनवणे यांनी केले..
राष्ट्रगीताने सांगता झाली.
शिबीर यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ सचिन नांद्रे, विभागीय समन्वयक डॉ दिनेश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ दिलीपगिऱ्हे आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ पी एस पाटील,मार्गदर्शन लाभले तर प्रा डॉ भरत खंडागळे,डॉ अस्मिता सोनवणे, डॉ श्वेता वैद्य, देवेंद्र सरदार, ईश्वर ठाकरे यांनी सहकार्य केले.


