भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक!  मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन..
1 min read

भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक! मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन..

Loading

भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक!

मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन..

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील भालेराव नगरमध्ये पाण्याचा व्हालचा खड्डा चांगला धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यावर बसविलेली लोखंडी जाळी तुटल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवित तातडीची दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. या मुख्य रस्त्यावर रोज हजारो नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात, त्यामुळे जाळीचे नुकसान नुकसान होताच अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत मराठी लाईव्ह न्युज ने ठळक बातमी प्रसिद्ध केली होती अजूनही नगर परिषदेने दखल न घेतल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी
वेवोतोलू केजो(भा.प्र.से) अमळनेर
यांना निवेदन दिले यावेळी
तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे ताबडतोब उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष न दिल्यास नागरिकांसाठी अपघातांची शक्यता नाकारणे अत्यंत कठीण होईल.
प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची अपेक्षा! केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *