सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
![]()
*सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री शिंदीकर,पर्यवेक्षिका सौ.लीना कुळकर्णी,ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना तायडे,सौ.वैशाली पाटील, सौ.रागिणी पुराणिक यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु.आयुशी अकोले व कु.दिव्या नन्नवरे या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान करून त्यांच्या भूमिकेत मी जिजाऊ बोलते हे भाषण सादर केले.त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शिंदीकर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.


