डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*
1 min read

डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*

Loading

*डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*

 

आज दि.09/01/2025 रोजी विष्णापुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समाजकार्य महाविद्यालय आयोजित *विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत डिजिटल साक्षरता आणि महत्त्व* या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रा. मारोती गायकवाड यांनी संबोधित केले . सदरील व्याख्यान अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे निर्मित साधनांच्या वापरा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मोबाईल, संगणक, टॅबलेट अशा विविध गॅजेटच्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञान वाढीसाठी तथा दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये डिजिटल साक्षरतेचे महत्व आणि उपयोगिता यावर चर्चा करण्यात आली. डिजिटल साक्षरतेच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या युगामध्ये झालेल्या प्रगती विषयी आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत व्याख्यानाच्या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संबोधी देशपांडे , प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे आणि प्रा. डॉ. राहुल निकम हे उपस्थित होते. तसेच या शिबिरासाठी बीएसडब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *