भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..
1 min read

भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..

Loading

भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..

जळगांव प्रतिनिधी
कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे संस्कृत सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा – गुरु माझा सखा निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा ,सांघिक खेळ, इत्यादी स्पर्धांना इत्यादी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी श्री सचिन परदेशी , उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प.जळगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांशी हितगुज करत असताना मायकेल जेम्स यांच्या जीवनावर आधारित अनुभवाचे बोल गोष्टी रूपात सांगितले .आपल्या आयुष्यात जिद्द व परिश्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाचे बक्षीस शाळेतील शिक्षिका अलका पितृभक्त यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ दिली. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक श्री एस डी भिरुड सर, उप मुख्याध्यापक श्री जे एस चौधरी सर, पर्यवेक्षक श्री के आर पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एम पाटील मॅडम तर बक्षीस वाचन टी टी चौधरी, पी व्ही ठोके आणि आभार प्रदर्शन यांनी रूपाली कोठावदे यांनी केले. सदर कार्यक्रमात एकूण 66 विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच खान्देश स्तरीय साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प तृतीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमारी दिपाली इंगळे हिचा सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गौरवाची बाब म्हणजे आमच्या शाळेतील इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली अनुष्का शिंपी हिचे देखील सत्कार व कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शाळेतील सर्वच घटकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *