आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*
1 min read

आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*

Loading

*आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी उपक्रमशील इंग्रजी शिक्षक शरद पाटील यांनी ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’ राबवली. यात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक दिवशी 50 स्पेलिंग पाठांतर करून सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी त्या बोलून दाखवल्या. हा उपक्रम सातत्याने मागील दोन महिन्यापासून राबविण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना स्पेलिंग पाठांतर करण्याची गोडी लागली. यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून दिले गेले. परिणामी विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन सुधारण्यात मदत झाली.
या स्पर्धेत सातत्याने स्पेलिंग पाठांतर करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना इंग्लिश डिक्शनरी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. त्यात प्रथम क्रमांक कुणाल प्रवीण करनकाळ, द्वितीय लोकेश सूर्यवंशी आणि तृतीय ईशांत धनगर यांनी पटकावला. हे बक्षीस शाळेचे प्राचार्य विजय बोरसे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी. डी.पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. इंग्रजी शिक्षक उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *