कल्याण पूर्वेतील ज्ञानमंदिर हायस्कूल मध्ये आविष्कार विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.* *तुमच्यातीलच एखादा विद्यार्थी मोठा वैज्ञानिक होऊ शकतो: सौ.नयना वाबळे*
![]()
*कल्याण पूर्वेतील ज्ञानमंदिर हायस्कूल मध्ये आविष्कार विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.*
*तुमच्यातीलच एखादा विद्यार्थी मोठा वैज्ञानिक होऊ शकतो: सौ.नयना वाबळे*
ठाणे: कल्याण:( मनिलाल शिंपी)अविष्कार 2024-2025 कल्पकते कडून कृतीकडे
छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे अविष्कार 2024-25 प्रदर्शनाचे मंगळवारी यशस्वी आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात 70 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन 20 प्रतिकृती सादर केल्या होत्या. सी आर सी प्रमुख श्री हामरे सर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.परीक्षक म्हणून सौ नयना वाबळे उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले पर्यावरण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आरोग्य विषयक प्रकल्प सादर करत विज्ञानाचा विकास कसा शक्य आहे हे प्रभावीपणे दाखवून दिले तसेच आपल्याला विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले तसेच तुमच्यातूनच उद्याचा शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे असे नयना वाबळे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय शाळेचे मुख्याध्यापक श्री. महादेव क्षीरसागर, विज्ञान विभाग प्रमुख सौ रुपाली गुजराथी यांचे मोलाचे योगदान आहे, विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक बंधू भगिनींनी विषेश परिश्रम घेतले, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले, प्रदर्शन पाहण्यास पालक शिक्षक व स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ रूपाली गुजराथी यांनी केले.सौ पल्लवी परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.


