गांधली मियावाकी विप्रो ऑक्सिजन पार्क आणि पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम येथे समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी अभ्यास भेट
![]()
गांधली मियावाकी विप्रो ऑक्सिजन पार्क आणि पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम येथे समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी अभ्यास भेट
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील गांधली येथे तालुक्यातील एकमेव अशा फॉरेस्ट अर्थात विप्रो ऑक्सिजन पार्क ग्रामपंचायत गांधी आधार संस्था अमळनेर आणि विप्रो कंपनी कडून विकसित करण्यात आला आहे .या नाविन्यपूर्ण अशा तंत्राद्वारे उभारण्यात आलेल्या मियावाकी फॉरेस्ट ला समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चया विद्यार्थ्यानी अभ्यास भेट दिली, पाहणी केली. ऑक्सिजन पार्क विषयी आधार संस्था प्रोजेक्ट मॅनेजर राकेश महाजन, संजय कापडे यांनी मियवाकी तंत्र आणि विप्रो ऑक्सिजन पार्क ची सविस्तर माहिती दिली.
समाज कार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ अनिता खेडकर, डॉ सागर राज चव्हाण, प्रा. डी आर ढगे यांचे सह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विदयार्थी यांनी तीन तास स्थळ भेट दिली. वॉटर शेड प्रकल्पातून निर्माण झालेल्या जलाशय भेट संपन्न झाली.

