शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा. *संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शिक्षण मंत्री दादा भुसे.*
![]()
**शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा.
*संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार: शिक्षण मंत्री दादा भुसे.*
*ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी)गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर चर्चा करण्याकरीता शिक्षक व संस्थाचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण आयुक्त, संचालक, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या समवेत आज दिनांक 06.01.2025 रोजी यशवंतराव सभागृह मुंबई येथे संपन्न झाली*
*याप्रसंगी राज्यातून आलेल्या अनेक शिक्षण संस्था चालकांनी आप आपल्या समस्या मांडल्या त्यानंतर कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्र्वर म्हात्रे सरांनी सर्व उपस्थीत शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे, संस्था चालकांचे प्रलंबीत प्रश्न मांडले सहा सक्षम करणे, गुणवत्ता वाढ करणे, शाळेसाठी सुविधा पुरवणे, शाळा आणि संस्थेला सामाजिक संरक्षण मिळणे , सरकारी जमीन नाम मात्र दराने शाळांना मिळावी , शिक्षण संस्था शिक्षक यांचे कौटुंबिक संबंध असावेत, शाळेमध्ये कौशल्य आणि शेती शिक्षणावर जोर द्यावा, नवीन शाळा मान्यता मास्टर प्लॅन नुसार द्याव्यात, पवित्र पोर्टल भरती जिल्हास्तरावर करावी, आदिवासी विभागातील रोस्टर तपासून मिळावे, क्रीडा कलागुणांना वाव मिळावा, सेवा जेष्ठता यादी संदर्भात स्पष्ट आदेश द्यावेत, तसेच प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळा तिथे लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक व शिपाई मिळावेत, वेतनेतर अनुदान मिळावे, विद्यार्थ्यांची एकच प्रकारची माहिती वर्षभरातून एकदाच मागवावी, अर्धवेळ शिक्षकांना पद गेल्या संरक्षण मिळावे तसेच पूर्णवेळमध्ये उन्नयन करावे, आर टी इ प्रतिपूर्ती शुल्क मिळावे , संच मान्यता दुरुस्ती तात्काळ करून घ्याव्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरळीत करावे, टप्पा अनुदान निधी उपलब्ध करून भविष्यात सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये, शाळांना वीज बिल लाईट बिल टॅक्स घरगुती दराप्रमाणे लावावा, आरटीई पुनर्मान्यता रद्द करावी इत्यादी विषय संस्थेचे शिक्षकांचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मांडले, सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करणार, व माननीय शिक्षण मंत्री सर्व प्रश्न सोडवतील असा विश्वास दाखवला व शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे साहेबांनी ही बैठक आयोजीत केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.*
*शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे साहेब बोलताना आपण सर्वांनी दिलेल्या सर्व सुचना मी घेतल्या आहेत आणि शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली आहे, त्यामुळे आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी निच्छितपणे प्रमाणिक प्रयत्न करणार असून त्याचा रिझल्ट देखिल आपल्याला येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये दिसेल असे आश्र्वासित करून आमदर म्हात्रे सर आपण मिळुन कोणाच्याही चुका न काढत बसता सर्वांना न्याय देऊन सर्वांना आनंदी करु असा विश्वास देत सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.*

