जोगेश्वरी पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती
1 min read

जोगेश्वरी पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती

Loading

जोगेश्वरी पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

जोगेश्वरी पोलिस स्टेशन चे वतीने जोगेश्वरी पूर्व स्टेशन रोड आय वाय कॉलेज समोर सायबर गुन्हे आणि फ्रोड रोखण्यासाठी जनजागृती पथनाट्य सादरीकरण इस्माईल युसुफ कॉलेज च्या विद्यार्थ्यानी सादर केले.यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी थांबून हे पथनाट्य पाहण्यासाठी पुढाकार घेतला.सध्या सायबर गुन्हे आणि फसवणुकीचा धंदा दिवसेंदिवस वाढत असून अनेकजण याला बळी पडत आहेत.अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत असून या सर्वाला आळा घालण्यासाठी मुंबईत सायबर फ्रोड रोखणे जनजागृती सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक ४ जानेवारी रोजी जोगेश्वरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितासाठी सदर नाटिका विद्यार्थ्यानी लोकांसमोर सादर केली.यावेळी निर्भया महिला पोलीस उपनिरीक्षक जिजा सातपुते, पोलिस उपनिरीक्षक दीपक लोणारे, मिल्स स्पेशल सुशांत जाधव, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *