नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये बालिका दिन साजरा
1 min read

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये बालिका दिन साजरा

Loading

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये बालिका दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये आज ३जानेवारी रोजी “सावित्री बाई फुले जयंती – बालिका दिन ” साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.अनिल चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रमुख वक्त्या म्हणून युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर च्या वतीने जि. प.मराठी शाळा निंबच्या उपशिक्षिका सौ.क्रांती पाटील उपस्थित होत्या.या प्रसंगी शाळेचे शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी काही विद्यार्थिनींनी आपले भाषण केले.प्रमुख वक्त्या सौ. क्रांती मॅडम यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मुलांपुढे मांडले.ज्येष्ठ शिक्षक श्री.सुतार सरांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व सांगितले.अध्यक्षीय भाषणात बापुसो. श्री.अनिल चौधरींनी त्या काळातील सर्वसामान्यांच्या शिक्षणातील अडचणी आणि संघर्ष याकडे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.१० वी ची विद्यार्थिनी कु. हर्षा चौधरी ने केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री. ए. जी. पाटील यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमावेळी इ. १० वी ची विद्यार्थिनी कु. जागृती पाटील ही सावित्री बाई फुलेंच्या वेशभूषेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *