विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई
![]()
विषय : सावित्रीबाई फुले
शीर्षक : शिक्षिका सावित्री आई
शाळेत जाऊन
शिकली ताई
शिक्षिका झाली
सावित्री आई….
डोळा आज ही
येत माझ्या पाणी
आठवता जोतीबा
सावित्रीबाई कहाणी
मुल बाळ नाही
म्हणून तिला हिणवल
सासू सासऱ्यांनी
घरा बाहेर काढल
माय ममतेच पुणं
पाषाण ह्दयी झालं
असह्य त्रास देवून
जगणं मुश्कील केल
ना हार मानली
ना झुकली सावित्री
हिंम्मत देत होता
ज्योतीबा महात्मा पती
दाखवून दिल जगाला
रिती परंपरा सार खोट
तर्क बुद्धी मानन
माणुसकी जगभर अफाट
स्त्री शिक्षण झाले
भाग्य त्यांचे उजळले
मानाचे स्थान स्त्रियांना
सावित्री आईनेच दिले
पुरुष स्त्रीला गुलाम
करू आज ही पाहतो
एखादा च महात्मा
बायको मागे उभा रहतो


आईसाहेब तुम्ही
सगळं दुःख सहल
या पंगुस तसंच
लोकांनी छळलं
आज ही एकटं
एकाकी आहे जीवन
शिक्षकी पेशा म्हणजे
वेदनांच च ज्वलंत जीन
शिक्षक विद्यार्थी आता
परीक्षा पुरतच नात
पासिंग झालं की,
शिक्षकांना विसरलच जात
लिहून कविता तुमचं
ऋण थोडस फेडतो
शिक्षकी पेशात दिव्यांगी
सद्कारणी देह जिझवतो
प्रकाश पाटील सर
एम ए बी एड नेट सेट
यशपंढरी इंग्रजी क्लास संचालक
…

