खडकपाडा पोलीस स्टेशनचा वतीने सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल व महानगरपालिका शाळेत रेजिंग डे निमित्त कार्यशाळा संपन्न.* *प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शेजारी व परिसरात सायबर क्राईम, व वाहतुकीच्या नियमानबद्दल जनजागृती करावी::वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंबरनाथ वाघमोडे.
![]()
*खडकपाडा पोलीस स्टेशनचा वतीने सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल व महानगरपालिका शाळेत रेजिंग डे निमित्त कार्यशाळा संपन्न.*
*प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शेजारी व परिसरात सायबर क्राईम, व वाहतुकीच्या नियमानबद्दल जनजागृती करावी::वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंबरनाथ वाघमोडे.
*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पोलीस दल स्थापना दिवस म्हणून *”पोलीस रेजिंग डे”* निमित्ताने खडकपाडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्राथमिक शाळा, उंबर्डे कल्याण प. शाळेचे विद्यार्थी यांचा पोलीस स्टेशन भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर वेळी त्यांना पोलीस स्टेशन येथे चालणारे कामकाजाबाबत माहिती देऊन त्यांना पोलीस स्टेशन मधील हत्यारे बाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.त्याचप्रमाणे दुपारी सेंट लॉरेन्स स्कूल,उंबर्डे रोड, कल्याण प येथे *सायबर जनजागृती तसेच गुड टच , बॅड टच* याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली.
सदर वेळी *सायबर तज्ञ ॲडव्होकेट संग्राम घुगे* यांनी सायबर जनजागृती विषयक मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय भालेराव यांनी गुड टच , बॅड टच तसेच सोशल मीडियाचा वापर आणि विना परवाना ड्रायव्हिंग याविषयी मार्गदर्शन केले. सदर वेळी सुमारे 200 विद्यार्थी व 15 शिक्षक तसेच शाळेच्या प्रिंसीपल उपस्थित होते.


