जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात अनुपमा जाधव यांच्या कवितेची निवड
![]()
जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात अनुपमा जाधव यांच्या कवितेची निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पुण्यात दिनांक २जानेवारी ते ५जानेवारी सलग चार दिवस जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवसाजरा होत आहे.देशातील पहिली मुलींची शाळा असलेला भिडेवाडा येथे आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फुले प्रेमी विजय वडेराव या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या महोत्सवात कविता सादरीकरण सोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात के.एल.पोंदा.हायस्कूलच्या डहाणू पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील, आदर्श शिक्षिका कथाकार अनुपमा जाधव यांच्या कवितेची निवड निवड मंडळाने केली आहे.अनुपमा जाधव यांनी मराठी, हिंदी, अहिराणी अशा विविध बोली भाषेत साहित्य लेखन केले आहे.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्यासाठी अभिनंदन! महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली.त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने हा फेस्टिवल होणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देश विदेशातून ६००हून अधिक कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमात कविता सादर केल्यानंतर सन्मानपूर्वक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

