नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
1 min read

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

Loading

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

अमळनेर प्रतिनिधी
नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण आणि विशेष अतिथी मनिकभाई यांच्या उपस्थितीत होते .संस्कार, योग आणि तुळसीचे महत्व यावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष अतिथी श्री. मनिकभाई यांच्या मार्गदर्शनाने झाली, ज्यामध्ये त्यांनी आयुष्यात संस्कारांचे महत्त्व आणि अभ्यासात मन केंद्रित करण्यासाठी आवश्यक अशा काही योगासने यांची प्रात्यक्षिके करुन दाखविली तसेच तुळसीच्या औषधीय गुणांची माहिती दिली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण यांनी तुळसीला भारतीय संस्कृतीत विशेष स्थान असून तिच्या औषधीय गुणांमुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असून तिचे पुजन त्याच्याठीच महत्वाचे ठरते असे मत व्यक्त केले तसेच योगा मानसीक आणि शारिरीक स्वास्थ्य प्रदान करते तर संस्कार आपले व्यक्तिमत्व ठरवते त्यामुळे संस्कार आणि योग ह्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर, विद्यार्थ्यांनी योगासने,ध्यान योग केले आणि योगाचे फायदे समजून घेत विविध योगासनांचा अभ्यास केला आणि त्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या समारोपात तुळसीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तुळशीच्या पानांना जल अर्पण करून तिची आराधना केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तुळसीच्या औषधीय महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवी आणि त्यांनी तुळशीची काळजी व संवर्धन करण्याचा घेण्याचा संकल्प केला.
शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत यशस्वी पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *