श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न
1 min read

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न

Loading

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न

 

अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी)

अमळनेर दिनांक ३० डिसेंबर २०२४ सोमवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ह.भ.प.परम पूज्य प्रसाद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर पाठशाळेतर्फे वधू वर सूचक पालक परिचय मेळावा संत सखाराम महाराज वाडी संस्थान समाधी मागे वाळवंटात घेण्यात आला. याप्रसंगी सकाळी ९ वाजेपासून वर वधू नोंदणी सुरू करण्यात आली होती यावेळी सुमारे 60 वधू वरांनी नोंदणी केली नोंदणीचे कार्य श्री सुरेश शिलेदार श्री ओमप्रकाश जोशी श्री सुमित कुलकर्णी श्री समीर पाठक यांनी सांभाळले त्यानंतर दुपारी एक वाजता सद्गुरु सखाराम महाराज यांच्या जयघोषाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रथम वेदघोष वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाठशाळेचे आचार्य श्री सुनील मांडे वेदमूर्ती श्री निलेश जोशी श्री मनोहर चौक यांनी केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाठशाळेचे जेष्ठ सदस्य आदरणीय प्रा. डॉ. प्र.ज.जोशी सर यांनी केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील श्री किशोरजी जोशी तथा त्यांच्या सौभाग्यवती सौ हेमलता जोशी (माहेर जळगाव) हे होते. उपस्थितांना त्यांचे कार्यातून आलेल्या अनुभवावरून उद्बोधक मार्गदर्शन लाभले अध्यक्षीय भाषण पाठशाळेचे अध्यक्ष श्री सुनील जोशी यांनी केली. यानंतर वर वधू सूचीचे प्रकाशन ह.भ.प.परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी दोन वाजता करण्यात आले त्यांनी ही उपस्थित पालकांना आशीर्वाद पर मार्गदर्शन केले. त्यानंतर नोंदणी झालेल्या वर वधू यादी वाचन ज्ञानेश्वर पाठशाळेचे कोषाध्यक्ष श्री शैलेश भावे यांनी केले त्यानंतर उपस्थित समाज बांधवांना सूचीचे वितरण उपाध्यक्ष महेश कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले मेळावा यशस्वीतेसाठी श्री भटू पाठक यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमास पाठशाळेचे जेष्ठ सदस्य आदरणीय श्री सुहास कुलकर्णी श्री शामकांत शुक्ल श्री रमेश जोशी श्री अजय शुक्ल श्री पंकज मांडे उपस्थित होते. जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तसेच सीमालगत गुजरात मध्य प्रदेश मधील गावना ही समाज बांधव मेळाव्यास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री प्रसाद जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *