एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… , भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…
1 min read

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… , भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

Loading

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !…

भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

प्रतिनिधी –

एरंडोल – तालुक्यातील माळीवाडा परिसरातील बालाजी मढी येथील रहिवासी सत्यशोधक समाज संघाचे सचिव कविराज व अविनाश दगडू पाटील यांचे वडील दगडू ( बापु ) नथ्थु पाटील यांचे वृद्धापकाळाने दि २१ डिसेंबर २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांची दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोल यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या स्मृतिप्रित्तर्थ कुटुंबातील सदस्यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र सचिव डॉ सुरेश झाल्टे यांनी प्रबोधन करताना शिक्षणाचे महत्त्व सांगून गुलामगिरीतून मुक्त व्हा असे प्रतिपादन केले. यानंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सर्व “साक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी ” हा सत्यशोधक समाजाचा मूलमंत्र आहे याप्रमाणे सर्वांनी विधी करावेत व शोषणापासून मुक्त व्हावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. यानंतर प्रा. के एस पाटील यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, रविंद्र महाजन, संजय महाजन, डॉ.सुरेश पाटील, मनोज पैलवान, भरत पाटील , लीलाधर पाटील, राजेश पाटील, विजय देसले व सगे सोयरे, आप्तेष्ट व समाज बांधव उपस्थित होते.

 

 

सदर कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने केल्याने सर्व शहरातील बंधूंनी कौतुक केले या पुढील सर्व विधी हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेले सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने करायला पाहिजे सर्व उपस्थित त्यांनी ठरवले वरील कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, रविंद्र तितरे, जिल्हा समन्वयक विजय लुल्हे, सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन यांच्याकडून मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *