समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात.
1 min read

समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात.

Loading

समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता एफ. वाय. बी. ए. ला
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. येथे अभ्यासक्रमात लागलीय. हार्दिक अभिनंदन!
उषा हिंगोणेकर या मराठी कविता प्रातांतील स्त्रीवादी जाणिवांचे कवितालेखन करणा-या लक्षवेधी कवयित्री आहेत.”मुद्रालेख”,”धगधगते तळघर”,”सगळेच पर्याय संपले आहेत” हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत.
“मौनाचा उच्चार” हा नवा कवितासंग्रह प्राईम बुक्स पब्लिशिंग हाऊस, जळगाव तर्फे 8मार्च 2025 आंतर राष्ट्रीय महिला दिनी सुप्रसिद्ध समीक्षक डाॅ.आशुतोष पाटील यांचे प्रस्तावनेसह प्रकशित होत आहे.

 

 

 

डाॅ. गंगाधर पानतावणे,डाॅ.यशवंत मनोहर, दा.गो. काळे,अंजली कुलकर्णी
डाॅ. फुला बागुल,डाॅ.युवराज पवार,
सदानंद देशमुख, आनंदापाटील,डाॅ.अनंता सूर, डाॅ.किसन पाटील, संजय चौधरी,भगवान ठग,डाॅ.छाया निकम,अशोक कोतवाल ,डाॅ. किर्ती मोरे आदी कवी/समीक्षकांनी त्यांच्या कवितेचे मराठी कविता प्रातांत अढळ स्थान अधोरेखित केलेले आहेय.
मान्यवर वाड़मयीन नियतकालिकात त्यांचे काव्य लेखनही 20वर्षेपासून सुरू आहे.मराठी कवितेला दिले जाणारे मानाचे वाड़मयीन 16 पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव. मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि मंडळ सदस्य या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *