महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्याच्या शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट
1 min read

महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्याच्या शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट

Loading

महाराष्ट्र गुजरात कर्नाटक
राज्याच्या शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :
सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता महाराष्ट्र ,गुजरात व कर्नाटक राज्यातील शालेय व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी खान्देश काव्यप्रबोध या शिर्षकाचा खान्देशी कवींच्या कवितांचा काव्यसंग्रह संपादित करून प्रकाशित केला.सदर क्रमिक पुस्तकात कवी आंधळे यांची लेणं या शिर्षकाच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.यापूर्वी याच विद्यापीठात एम.ए.,मराठी या वर्गासाठी कवी आंधळे यांच्या पंधरा मराठी गझल अभ्यासक्रमात होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ,गुजरात शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथी,इयत्ता सहावी तसेच महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रमात इयत्ता तिसरी इयत्ता अकरावी,कर्नाटक राज्यात बिदर विद्यापीठात पदवी अभासक्रमात कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
प्रा.आंधळे यांनी नुकतेच दि.२८.१२.२०२४ रोजी पुणे येथे आयोजित साहित्यिक कलावन्त राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात मराठी गझलमीलाफ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
त्यांच्या चौफेर चाललेल्या यशदायी वाटचालीचे साहित्यिक सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *