चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट
1 min read

चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट

Loading

चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट

अमळनेर प्रतिनिधी
दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसराने संचालित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत एक महत्त्वाची घटना घडली. श्री. रोशन ज्ञानेश्वर पाटील, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल ऑपरेशन, व्हेक्टर बायोसोर्स इन्क., मॅसॅच्युसेट्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आपल्या कुटुंबीयांसमवेत शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांच्या सोबत वडील श्री. ज्ञानेश्वर फकिरा पाटील आणि काका श्री. रविंद्र नामदेव पाटील उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. शाळेतील विशेष शिक्षक हेमंत महाजन सरांनी शाळेची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

 

 

सदिच्छा भेटीच्या निमित्ताने रोशन दादांनी शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना ५० ड्रेस भेट दिले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह वाढला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सरांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले, आणि यावेळी शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, शाळेच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *