सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
1 min read

सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Loading

सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 

जळगाव प्रतिनिधी

शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.प.न.लुंकड कन्याशाळेचा ७५व्या अमृत महोत्सवांतर्गत शारदोत्सवानिमित्त संस्कृती हा महाराष्ट्रातील सण आणि उत्सवावर आधारित असलेला कार्यक्रम जल्लोषात पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शि. प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड्.सुशील अत्रे,पदाधिकारी मा.अभिजित देशपांडे,मा.प्रेमचंदजी ओसवाल, मा.सौ.मीरा गाडगीळ,मा.महेंद्र लुंकड, मा.प्रा.शरच्चंद्र छापेकर,मा.सौ पद्मजा अत्रे, मा.ॲड्.पंकज अत्रे, मा.सौ.रेवती शेंदुर्णीकर,मा.सचिन दुनाखे,मा.सौ.प्रिया देशपांडे, मा.ॲड्.भारती इसई, मा.सौ.प्रतिमा देशकर,मा.सौ.बीना गांधी,मा.सौ.विशाखा गर्गे, मा.सौ.लता छापेकर, मा.सौ.रजनी पाठक यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शिंदीकर यांच्या संकल्पनेतून संस्कृती हा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात विविध सण आणि उत्सव अतिशय सुंदर व देखण्या स्वरूपात दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे लेखन व निवेदन ज्येष्ठ शिक्षिका सौ.रमा तारे यांनी केले व प्रास्ताविक संगीत शिक्षिका सौ.रागिणी पुराणिक यांनी तर आभार प्रदर्शन सौ.वंदना वाणी यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.लीना कुळकर्णी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत घेऊन यशस्वीरीत्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *