२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
![]()
२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिरसाळे ता. अमळनेर येथील पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिरसाळे येथे रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर विभागाचे निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाडकर तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाना जळगाव जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्नेहा पवार आदिवासी विकास विभाग नाशिकचे सह आयुक्त कपिल पवार जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी बाबुलाल पाटील जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील अंमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे नोबेल फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष जयदीप पाटील अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जिभाऊ पाटील तर मानकरी पाहुणे म्हणून गोंदियाच्या उपजिल्हाधिकारी सामान्य सौ मानसी पाटील व भंडारा येथील डीएफओ संतोष गांधीले उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात माजी विद्यार्थी स्वागत मिरवणूक स्वागत समारंभ प्रमुख पाहुण्यांची व माजी विद्यार्थी मनोगते सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन खेळ हळदीकुंकू अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आलेले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय रामचंद्र शिरोडे उपाध्यक्ष संतोष धंजी चौधरी सेक्रेटरी जगतराव शंकर पाटील स्कूल कमिटी चेअरमन रामलाल वंजी पाटील संचालक युवराज भावराव पाटील पोपट अर्जुन चौधरी गोरख रावण पाटील ललित जयंतीलाल जैन विनायक सोमा पाटील पुंजू दगडू कुंभार रमेश विरचंद जैन उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळे तर्फे करण्यात आलेले आहे.


