राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड
1 min read

राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड

Loading

राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी संघटनेची आज दि. २६/१२/२०२४ रोजी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक श्री. के. के. आंधळे व राज्याध्यक्ष श्री. डी. पी. शिंदे यांच्या उपस्थिती त कामगार, कर्मचारी व संवर्ग अधिकारी वर्गाचा भव्य मेळावा संपन्न झाला असून यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते.
या वेळी श्री. आंधळे व श्री. डी. पी. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून अमळनेर नगरपरिषद हद्दीसाठी नूतन कार्यकारिणीच्या फलकाचे अनावरण करून अमळनेर साठी श्री. प्रसाद शर्मा यांची अध्यक्ष पदी व श्री. ईश्वरलाल पाटील यांची उपाध्यक्ष पदी नेमणूक करून नाशिक विभागासाठी अध्यक्ष पदी श्री. सोमचंद संदानशिव यांची तर चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके यांची उपाध्यक्ष पदी, अमळनेर चे आरोग्य निरीक्षक श्री. संतोष बिऱ्हाडे यांची सचिव पदी तर अंमळनेरचे आरोग्य निरीक्षक श्री. किरण कंडारे यांची नेमणूक करून चोपडा नगरपरिषद
अध्यक्ष पदी श्री. महेश जोशी यांची नेमणूक केली असून या वेळी कार्यकारिणी सदस्य पदी, नितीन बिऱ्हाडे, जया सरदार, चोपड्या चे श्री. भोंगे यांची निवड झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त प्रशासन अधिकारी श्री. संजय चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक श्री. सोमचंद संदानशिव यांनी केले या वेळी उपस्थित मान्यवरांचे अखिल महाराष्ट्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाईगार संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल बेंडवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचा सत्कार केला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद तर्फे मा. नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी संविधानाची प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच अखिल महाराष्ट्रसफाई मजदूर कांग्रेस चे विकास जाधव व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.आभार प्रदर्शन श्री. संतोष बिऱ्हाडे यांनी करून कार्यक्रम समाप्त केलाः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *