महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन
![]()
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने
खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन
प्रतिनिधी पिंपळे(डॉ युवराज पाटील)
आज दि. 24/12/2024 रोजी श्री निंबा दला चौधरी रा. चिमणपुरी पिंपळे येथे खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस शेतकऱ्यांना तूर या वानविषयीं सखोल माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री जोशी साहेब यांच्या मार्फत माहिती देण्यात आली. तसेच मोहिनी जाधव कृषी क्षेत्र अधिकारी यांच्या मार्फत ज्युट , जैविक खते, बुरशीनाशके व भाजीपाला बियाणे हे जास्तीत जास्त घेण्याविषयीं आवाहन करण्यात आले. यावेळेस श्री निंबा चौधरी प्रगतीशील शेतकरी ह्यांनी सोलर सिस्टिम वर चालणाऱ्या कामगंध सापळा विषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमांस परिसरातील शेतकरी माझी शेती संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील जीवन पाटील जयवंत पाटील गोकुळ पाटील निंबा चौधरी छोटू चौधरी ,भीमराव पाटील,राजेंद्र पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते

