पारोळा येथे बालविवाह मुक्त भारत या विषयावर रॅली ,पथनाट्य ,मानवी साखळी, शपथ कार्यक्रम संपन्न.
1 min read

पारोळा येथे बालविवाह मुक्त भारत या विषयावर रॅली ,पथनाट्य ,मानवी साखळी, शपथ कार्यक्रम संपन्न.

Loading

पारोळा येथे बालविवाह मुक्त भारत या विषयावर रॅली ,पथनाट्य ,मानवी साखळी, शपथ कार्यक्रम संपन्न.

पारोळा:
येथील किसान महाविद्यालय आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमान रॅली पथनाट्य मानवी साखळी शपथ कार्यक्रम किसान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संपन्न.
प्रारंभी या कार्यक्रमात संदेश संदानशीव यांनी बालविवाह मुक्त भारत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. शिरीष सूर्यवंशी, प्रा.प्रदीप औजेकर यांनीही मार्गदर्शन केले.
मानवी साखळीतून तसेच किसान महाविद्यालय, गोंधळ वाडा, आझाद चौक, राजीव गांधी नगर या मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान सर्वांचा एकच विचार, बालविवाह मुक्त परिवार, आणि कमी वयात मुला मुलींचे लग्न करू नका अशा घोषणा देण्यात आल्या.

पारोळ्यातील आझाद चौकात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. पथनाट्यामधून बालविवाह मुक्त भारत या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कमी वयात मुला मुलींचे लग्न न करण्याचा संदेश दिला.
याप्रसंगी पारोळा तालुका समन्वयक जीवन मोरे, आधार संस्था प्रतिनिधी संदेश संदानशीव, सायली संदानशीव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *