झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न
1 min read

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

Loading

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

 

जळगांव प्रतिनिधी

दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार रोजी जुने भगवान नगर किलबिल शाळेत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे एक दिवसीय गाईड शिबिर घेण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात गाईड दौड व योगासनाने केली त्यानंतर लेडी बेडन पॉवेल यांना मानवंदना करून ध्वजगीत व सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या सदर शिबिरात गाईड विद्यार्थिनींनी बिना भांड्यांचा चुलीवरचा स्वयंपाक करून वेगवेगळ्या प्रकारच्या पाककलांचे प्रदर्शन करून तंबू सजावट केले. तृप्ती आटाळे व रत्नप्रभा नेमाडे यांनी तंबूचे निरीक्षण केले गाईड विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्ट्रेचर दोरीच्या गाठींचे प्रकार व स्कार्प चे वेगवेगळे उपयोग कसे करावे ते सांगून बौद्धिक माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी व गाणी शिकविण्यात आली. गाईड ट्रुपला भेट देण्यासाठी किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे पर्यवेक्षक एन बी पालवे ,डी.ए पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाची सांगता शेकोटी करून विविध प्रकारचे गीत नृत्याने झाली. गाईड प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा लोहार , वर्षा चौधरी, पूनम कोल्हे व सुचिता बावस्कर यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *