समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र
![]()
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे पोषण आहार प्रशिक्षण सत्र
अमळनेर प्रतिनिधी
व्हिटॅमिन अंजेल Vitamin Angel या जागतीक स्तरावर कार्य करीत असलेल्या संस्थे तर्फे पाच महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना व्हिटॅमिन ए गोळ्याचे डोस देऊन कुपोषण मुक्त करणेसाठसाठी आधार संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय अभियान राबविणार आहे.
या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण सत्र घेणेत आले. व्हिटॅमिन अँजेल चे राज्य संयोजक छाया राऊत, क्षमता बांधणी तज्ञ प्रियांशु शर्मा, कार्यक्रम अधिकारी गौरव चव्हाण, प्रोग्राम लीड प्रताप रंधवा यांचेसह आधार संस्था प्रतिनीधी दिपक
संदानशिव, दीप्ती गायकवाड यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे
अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अनिता खेडकर, डॉ अस्मिता सोनवणे, प्रा विजयकुमार वाघमारे,प्रा धनराज ढगे, डॉ सागरराज चव्हाण, डॉ भरत खंडागळे उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी आणि टीम ने पथनाट्य सादर केले.
सूत्रसंचलन रविंद्र कराड, भावेश मराठे, आभार मोहिनी धनगर यानी मानले


