देवगाव देवळी हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन…
1 min read

देवगाव देवळी हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन…

Loading

देवगाव देवळी हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन…

अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
अगोदर संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रतिमेला अभिवादन केले.
संत गाडगेबाबा यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. यांच्या विचार आत्मसात केले पाहिजे असे सांगितले..

यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,ए.एस.सोनटक्के व व शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *