कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध- श्रीमती कल्पना चव्हाण.
![]()
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध- श्रीमती कल्पना चव्हाण.
जळगांव: जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य समस्यांच्या सोडवणुकीसाठी संघटना पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेचे आज मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या दालनात मा.श्री. आर. एच.शर्मा (अधिक्षक वेतन पथक कार्यालय), मा.एजाज शेख (प्र.शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक)यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुढील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
1) सन 2021-22 पासून पी.एफ. स्लिप मिळणेबाबत.
2)NPSच्या रकमा वेळच्यावेळी संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्यात याव्यात
3) न.पा.संचलित ज्यु.कॉलेज चे वेतन नियमित होणेसाठी वेळेवर निधी उपलब्ध होणेसाठी शासन दरबार प्रयत्न करणे.
4) मा.दिपाली पाटील मॅडम यांची नाशिक येथे पदोन्नती झाल्याने जळगांव येथे कायमस्वरूपी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांची नेमणुक करणेबाबत.
5) उच्च माध्यमिक / ज्यु.कॉलेज यांच्या एफ.जी./इबीसी कॅम्पचे आयोजन करणेबाबत.
6) वरीष्ठ/निवडश्रेणी प्रशिक्षण तात्काळ घेणेबाबत.
7) सातव्या वेतन आयोगाने काही क.म.वि.शिक्षकांचे 4/5 वा हप्ता जमा करणेबाबत.
8) सन 2017 पासून वेतन सुरू आहे परंतु थकित वेतन जमा नाही.
9) वरीष्ठ/निवडश्रेणी लागू झालेल्या शिक्षकाची काही महिन्यांची फरकाची रक्कम जमा करणेबाबत.
10) 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या इ.12 वीच्या बोर्ड परिक्षेच्या भरारी पथकात क.म.वि.शिक्षकांना सामावून घेणे.
नियमित वेतन होण्यासाठी सर्व लिपिक बंधूंनी आपापल्या आस्थापनेचे वेतन देयक दरमहा दि.७तारखेपर्यंत ऑनलाईन सादर करून त्याची स्थळप्रत वेतन पथक कार्यालयात दि.१५ तारखेपर्यंत जमा करणे अत्यावश्यक आहे. तसेच थकीत वेतनासाठी मा.संचालक कार्यालयात प्रस्ताव पाठविला असून लवकरच अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे तसेच अंशतः अनुदानित व न.पा.संचालित चारही क.म. वि.साठी पर्याप्त अनुदान शासन स्तरावरून उपलब्ध होत नसल्याने दरमहा त्यांचे वेतन अदा होण्यास अडचण येत असली तरी उपलब्ध अनुदानात जितक्या अंशतः अनुदानित उ.मा.वि./क.म.विं. चे वेतन जमा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे श्री.शर्मा साहेबांनी सांगितले.
याप्रसंगी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती.कल्पना चव्हाण यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना आश्र्वासित केले.
यावेळी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष),प्रा.सुनील गरुड जेष्ठ (मार्गदर्शक),डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष),प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष),प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा. डी.जे.चिकटे (सहसचिव),प्रा.स्मिता जयकर,प्रा.अनिता ओव्हाळ, प्रा.स्वाती पांढरे(महिला प्रतिनिधी), प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा.राजेश कोष्टी,प्रा.धनराज भारुडे उपस्थित होते.

