थंडीपासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
1 min read

थंडीपासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

Loading

थंडीपासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्राध्यापकांनी, आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी ब्लँकेट वाटप केले.
या कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजच्या संचालक ऍड. रोहन दादा मोरे यांच्या विशेष उपस्थितीत झाली. त्यांनी योजनेची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली.
संस्थेचे अध्यक्ष आण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
डॉ. सचिन नांद्रे सर, डॉ. अजय पाटील सर, डॉ. डी. एन. सूर्यवंशी सर, डॉ. मनिष करंजे सर आणि श्री. धिरज माळी सर हे उपस्थित होते. शाळेतील विशेष शिक्षक हेमंत महाजन सर यांनी शाळेची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आव्हानांबद्दल व त्यांच्या क्षमता वाढविण्यात केलेले कार्य चर्चित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले. त्यांनी उपस्थितांची माहिती प्रभावीपणे सादर केली आणि सर्वांच्या योगदानाबद्दल आभार मानले.
ही घटना केवळ ब्लँकेट वाटपाचीच नव्हे, तर एकत्र येऊन सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारी होती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थंडीपासून संरक्षणाची ही कृती एक आदर्श उदाहरण आहे जे दर्शवते की आपल्यातील संवेदनशीलता व स्नेहाच्या धाग्यांनी कसे समाजातील विविध घटक एकत्र येऊ शकतात अशा मदतीसाठी धावणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या योगदानाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश महाजन यांनी धन्यवाद व्यक्त केले..

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *