जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धा संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे आयोजन
1 min read

जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धा संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे आयोजन

Loading

जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धा संपन्न
शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

जळगाव येथील पंचायत समिती जळगाव शिक्षण विभागातर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमांस प्रोत्साहन देण्याकरिता तालुका स्तर परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जळगाव तालुक्यात दोनशे शहाएंशी शाळा असून सर्व शाळांना परसबाग उपक्रम राबवण्यासाठी सूचित करण्यात आले होते.परसबाग निर्मिती मुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना आनंद मिळावा हा या उपक्रमाचा हेतू आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत व शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आली.शाळांमध्ये परीक्षण करतांना टमाटे, वांगी, मिरची, भेंडी, गिलके इत्यादी भाजीपाल्याची रोपे लावून त्याचा वापर शालेय पोषण आहारात केला जात असल्याचे दिसून आले.परसबाग स्पर्धेच्या परीक्षणासाठी गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, जितेंद्र चिंचोले, केंद्रप्रमुख अनिता परमार, कैलास पवार, कृषी विस्तार अधिकारी सुनील दांडगे, विषय तज्ञ गोपाळ शहारे यांच्या समितीने सहभागी शाळांना भेटी देऊन पाहणी केली.जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
प्रथम – जि प शाळा वराड बु
द्वितीय -श्रवण विकास मंदिर सावखेडा शिवार
तृतीय -( विभागून )जि प शाळा जळगाव खु आणि जि प शाळा पळसोद
प्रोत्साहनपर चौथा -सार्वजनिक विद्यालय असोदा
प्रोत्साहनपर पाचवा -न्यू इंग्लिश स्कुल नशिराबाद
प्रोत्साहनपर सहावा -थेपडे माध्यमिक विद्यालय म्हसावद
सदर शाळांना प्रथम क्रमांक साडेसात हजार, द्वितीय क्रमांक पाच हजार, तृतीय क्रमांक तीन हजार व प्रोत्साहनपर तीन शाळांना प्रत्येकी दोन हजार रुपये पारितोषिक मिळणार आहे असे शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *