ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
![]()
ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका
पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी-
संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
नविन माध्यमिक विद्यालय अंतुली”-रंजाणे,ता.अमळनेर, जि.जळगाव येथील उपक्रमशील शिक्षीका शैला गंगाधर बैसाणे त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे सन्मानपत्र,शिल्ड देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा.निवेदिता माने, उद्योजक श्री एन.सी.संघवी, सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी,
सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त ,श्री सुर्यकांत तोडकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर, काकासाहेब देशमुख, सौ.संगिता शिंदे,डॉ.सायली पवार ,डॉ.चंद्रकांत बाबर व ईगल फोंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर उपस्थित होते.
शैला बैसाणे यांना ईगल फाउंडेशन चा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

