राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
![]()
राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 14 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन पंधरवड्या निमित्त राष्ट्रविकास मायग्रेंट टी. आय. प्रोजेक्ट ,जळगाव , महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई , जिल्हा डापु विभाग जळगांव तसेच ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थलांतरित कामगारांसाठी श्री.जी. जिनिंग, धरणगाव येथे एचआयव्ही /एड्स रक्त तपासणी व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले
TAKE THE RIGHTS PATH ( मार्ग हककाचा,सन्मानाचा!)या प्रमुख ध्येयास अनुसरून एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या बातीत सहानुभूतीपूर्वक वागणूक, कामाच्या ठिकाणी योग्य मोबदला व हक्क ,सामाजिक बांधिलकी, आपुलकी दाखवणे कलंक व भेदभाव नष्ट करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे आणि याच अनुषंगाने एच आय व्ही / एड्स संदर्भात जनजागृती माहिती मार्गदर्शन व प्रदर्शन व रक्त तपासणी शिबिराचे वारंवार आयोजित करण्यात येते. तरी या सर्व शिबिरांचा लाभ आपण वेळोवेळी घ्यावा असे आव्हान उपस्थित सर्व कामगार बंधूंना सदर कार्यक्रमात करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिनिंगचे मालक सुरेश नाना चौधरी तसेच जीवन आप्पा बयेस, माजी नगरसेवक निलेश भाऊ चौधरी , डॉ. अक्षय जगताप, समुपदेशक श्री ज्ञानेश्वर शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री राजेश्वर काकडे ह्यांची प्रमुख उपस्थितीत होती अशा प्रकारे राष्ट्रविकास संस्थेमार्फत जळगांव जिल्हयात विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगारासाठी असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आले त्या राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भुपेन्द्र महाले व प्रकल्प प्रमुख तुषार पाटील यांचे वेळोवेळी अशा कार्यक्रमासाठी सहकार्य मिळते तसेच जिल्ह्य़ातील अधिकारी मा.श्री संजय पहुरकर , गिरीश गडे , मोजीम खान, शुभांगी पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील सहकार्य मिळत असते तसेच सर्व स्थानिक आयसीटीसी यांचे देखील सहकार्य मिळत असते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रविकास संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी नियोजन केले त्यामध्ये प्रकल्प मॅनेजर नवल पाटील समुपदेशक अमोल सूर्यवंशी,सचिन चौधरी ,ओ आर डब्ल्यू दिलीप पाटील,राजेश्वर पाटील, नजीम पठाण,गणेश पाटील निलेश पाटील, स्वंप्निल पाटील,नितेश चव्हाण,तुषार विसपुते,गणेश राजपूत,डाॅ.मैहफुज अली यांनी नियोजन करुन सदर कार्यक्रम घेतले त्या वेळेस स्थानिक पातळीवर देखील मदत मिळाली

