विज्ञान प्रदर्शनात गांधी बाल मंदिर ने पटकावली अनेक बक्षिसे
1 min read

विज्ञान प्रदर्शनात गांधी बाल मंदिर ने पटकावली अनेक बक्षिसे

Loading

विज्ञान प्रदर्शनात गांधी बाल मंदिर ने पटकावली अनेक बक्षिसे

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

५२ वे एल वॉर्ड विज्ञान प्रदर्शन विवेकानंद हायस्कूल नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये दक्षित केसरकर, अपूर्वा सकपाळ, आर्या पांगम, अस्मि भेकरे, राणाजी इंगळीकर, कृणाल मालप, जान्हवी ढमाळ या विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकाविले. तर लोकसंख्या शिक्षण प्रकल्पत शिक्षक घनश्याम जोशी यांना द्वितीय क्रमांक, तसेच मिशन स्वच्छ भारत प्रकल्पत शिक्षक रुपेश नकाशे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.सर्व विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, सहाय्यक, मदतनीस यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सदर प्रकल्पामध्ये चांद्रयान तीन चा लाइव प्रकल्प शाळेतील शिक्षक अवधूत चव्हाण व अमोल जागले यांनी तयार केला होता तर सेल्फी पॉईंट शिक्षक विश्वनाथ पांचाळ व रत्नकांत विचारे यांनी तयार केला. तसेच सानिया गिजे व सई या विद्यार्थिनींनी सुंदर असा चांद्रयान प्रकल्प साकारला.सर्व सहभागी विद्यार्थी,पालक, शिक्षक यांचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ आणि पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *