जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध स्पर्धा संपन्न*  *मयुरी कोळी, जयमाला लोखंडे,नेत्रा पाटील प्रथम*
1 min read

जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध स्पर्धा संपन्न* *मयुरी कोळी, जयमाला लोखंडे,नेत्रा पाटील प्रथम*

Loading

*जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध स्पर्धा संपन्न*

*मयुरी कोळी, जयमाला लोखंडे,नेत्रा पाटील प्रथम*

जळगाव : येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी-
भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे निबंध,वक्तृत्व व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध 18 शाळांचे 126 विद्यार्थी सहभागी झाले होते.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षा साधना लोखंडे, भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस. डी. भिरूड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी साधना लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’असे सांगून वाचन हेच बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशामागील रहस्य आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जळगाव शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप वाणी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव सुनील तायडे, कौन्सिल सदस्य चित्रा नारखेडे, के. टी.चौधरी, एन.ओ.चौधरी,महेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले. व्ही. डी. पाटील,निर्मल चतुर,एस. एस. करलकर, पवार सर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. कोळी व आशिष पाटील यांनी केले. सुनील तायडे यांनी आभार व्यक्त केले.

*बक्षीस पात्र विद्यार्थी*

*निबंध स्पर्धा*
मयुरी कोळी (भगीरथ शाळा : प्रथम ), मोहित बिऱ्हाडे (का. ऊ. कोल्हे : द्वितीय ), वैष्णवी पाटील (ए. टी. झांबरे विद्यालय : तृतीय ),
अनुष्का जाधव ( खूपचंद सागरमल विद्यालय: उत्तेजनार्थ ),
भूमिका कापडणीस ( नंदिनीबाई विद्यालय: उत्तेजनार्थ ), शाह अफिका नदीम अहमद ( के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल : उत्तेजनार्थ )

* *वक्तृत्व स्पर्धा*
जयमाला लोखंडे ( नंदिनीबाई विद्यालय :प्रथम ), काव्या फेगडे ( ए.टी.झांबरे विद्यालय : द्वितीय ), केतन पाटील ( ए.टी. झांबरे विद्यालय : तृतीय ), नेत्रा पाटील (भगीरथ शाळा उत्तेजनार्थ )

*नाट्यछटा स्पर्धा*
नेत्रा पाटील (भगीरथ शाळा :प्रथम ), वैष्णवी पाटील (ए.टी. झांबरे विद्यालय :द्वितीय ), आर्या पाटील, ( नंदिनीबाई विद्यालय :तृतीय ), साक्षी कोळी नंदिनीबाई विद्यालय : उत्तेजनार्थ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *