रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मुंबईत रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन.
![]()
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मुंबईत रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन.
मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे)
रक्तदान हे जीवनातील सर्वोत्तम दान मानले जाते. नक्कीच ते एक महान कार्य आहे. दवाखाने आणि रुग्णालयांना अनेक कारणांसाठी सतत रक्ताची आवश्यकता असते. यामुळे रक्तदानाची कल्पना एक उदात्त कारण बनते कारण यामुळे लोकांना आणि रुग्णांना जीवनरक्षक मदत मिळते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रक्तदान करणे त्यांच्या शरीरासाठी हानिकारक आहे, तथापि, हे खरे नाही. केवळ दुखापत किंवा अपघात झाल्यास रक्ताची गरज भासत नाही, तर रुग्णाला प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्सचीही गरज असते. अशा वेळी रक्तपेढीत पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध असल्यास रुग्णांवर सहज उपचार होऊ शकतात. त्यामुळे गरजूंना योग्य वेळी पुरेसे रक्त मिळावे यासाठी लोकांनी नियमित रक्तदान करावे.
रक्ताची गरज पाहून क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्सचे शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौल सर हे सलग पंधरा वर्षे मुंबई, अंधेरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. या वर्षी चिल्ड्रेन वेलफेअर स्कूल वर्सोवा, अंधेरी येथे रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पश्चिम उपनगरातील अनेक शाळांतील शिक्षक, महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांसह शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेऊन समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी व्यक्त केली.
मुख्याध्यापक अजय कौल सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपक्रम प्रमुख प्रशांत काशीद सर यांनी या शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

