चला नवी पिढी घडवूया ! विषयावर उद्या व्याख्यान संजय आवटे यांचे मार्गदर्शन
1 min read

चला नवी पिढी घडवूया ! विषयावर उद्या व्याख्यान संजय आवटे यांचे मार्गदर्शन

Loading

चला नवी पिढी घडवूया ! विषयावर उद्या व्याख्यान
संजय आवटे यांचे मार्गदर्शन

जळगाव -पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन तर्फे शहरात उद्या दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार व लेखक दैनिक लोकमत पुणे चे संपादक संजय आवटे हे चला नवी पिढी घडवूया या विषयावर मार्गदर्शन करतील.
सदर व्याख्यान संध्याकाळी साडेपाच वाजता नवीन बस स्टैंड जवळ कांताई सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे .याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा कुलगुरू डॉ. के बी पाटील ,प्रकुलगुरू डॉ.पी पी माहूलीकर ,
जैन उद्योग समूहाच्या निशा भाभी जैन ,प्राचार्य एल पी देशमुख ,प्राचार्य अनिल लोहार ,उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम प्रसंगी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा 2024 च्या माध्यमातून इसरो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक जयदीप पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *