भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न  आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती
1 min read

भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती

Loading

भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न

आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती

जळगांव प्रतिनिधी :
कै.सुनीता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे तसेच उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी.निकम होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, वर्गात पहिल्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढी क्षमता असते किंबहुना त्यापेक्षाही अधिक क्षमता शेवटच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असते. मी तर शालेय जीवनात बुद्धीचे काम नसलेल्या ‘लिंबू -चमचा’ स्पर्धेत भाग घ्यायचो. अशा खुमासदार शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर उपशिक्षणाधिकारी (माध्य. विभाग ) फिरोज पठाण म्हणाले,सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. ध्येय निश्चित करा, कठोर परिश्रम करून ते पूर्ण करा. परिस्थितीची जाणीव ठेवा.असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीगणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त शाळेमध्ये श्रीगणेश मूर्ती रंगवणे,मेहंदी काढणे, सुंदर हस्ताक्षर, स्मरणशक्ती, चित्रकला, देशभक्ती गीतगायन, चेहरा रंगवणे,वक्तृत्व, एकलनृत्य, रांगोळी, संस्कार भारती, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील बक्षीसपात्र 80 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील,ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड उपस्थित होते.
बक्षीस वाचन गणेशोत्सव समिती सदस्य के. पी. पाटील, के. व्ही. पाटील, आर. डी. पाटील, जे. पी. धनगर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही.ठोके यांनी केले तर पी. जी. पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *