स्नेहल माळीला राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत कास्यपदक*
1 min read

स्नेहल माळीला राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत कास्यपदक*

Loading

*स्नेहल माळीला राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत कास्यपदक*

अमळनेर: येथील स्नेहल माळी या विद्यार्थिनीला 10 डिसेंबर 2024 रोजी ओरिसा राज्यातील ओखापुरी येथे झालेल्या 29 व्या राष्ट्रीय रोड सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदकाचा बहुमान प्राप्त झाला आहे. ती धनदाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत हे तिचे चौथे पदक आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील विजेते खेळाडू, याचबरोबर रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, खेलो इंडिया इत्यादी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. लहानपणापासूनच सायकलिंग या खेळाची आवड असलेल्या स्नेहल माळी हिनेअत्यंत चिकाटीने या स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केल्याने तिच्या भविष्यातील आशा प्रज्वलित झाल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रीय सायकलिंगस्पर्धेत कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कास्यपदक तर रांची येथे सिल्वर मेडल तिने प्राप्त केले आहे. सायकलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे साठे सर, जिजामाता पुरस्कार प्राप्त दिपाली निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिपाली शिळदानकर तसेच तिचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे अनमोल मार्गदर्शन तिला लाभल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष के. डी. पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, क्रीडा प्रशिक्षक डॉ शैलेश पाटील, डॉ किशोर पाटील, विष्णू शेट्ये यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अमळनेर येथील पिंपळे रोड रहिवासी तथा सध्या पुणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्री शरद बिलबिले यांची ती कन्या असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *