अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला  (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)
1 min read

अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)

Loading

अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला

(विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे प्रस्थ व राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठे नेते शरद पवार यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट घेतली.
साऱ्या देशाचे नेते शरद पवार यांचा 85 वाढदिवस साजरा होत आहे. शरद पवार यावेळी वाढदिवसाच्या निमित्त दिल्ली येथील निवासस्थानी आहेत . दिल्ली येथील निवासस्थानी भेटण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या पत्नी खासदार सुमित्रा पवार व त्यांचा पुत्र पार्थ पवार दिल्लीला गेले आणि राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या. अजितदादा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादी पार्टीचे बडे नेते यामध्ये प्रफुल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ व सुनील तटकरे सुद्धा या भेटीत उपस्थीत होतेह शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल मात्र संजय राऊत यांनी विशेष टिपणी केली. आहे शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नवीन देशाचे मोठे नेते आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय त्या राज्यात काही होऊ शकत नाही या मुळे ही भेट झाली. अशी टिपणी केली केलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या या राजकीय भेटीत किंवा वाढदिवसाच्या भेटीत कोणती चर्चा झाली हे मात्र अध्यापी गुलदस्त्यात आहे. शरद पवार व अजितदादा पवार यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली व संभाव्य मंत्रीमंडळातील सदस्यांच्या समावेशाची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *