फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी
1 min read

फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४५ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खा. शि. मंडळाचे चिटणीस प्रा. डॉ. अरुण बी. जैन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्र प्राचार्य प्रा.रविंद्र माळी यांनी श्रीमंत प्रतापशेटजी यांच्या उद्योग, शिक्षण, अध्यात्म व वैद्यकीय सेवा क्षेत्रातील योगदानाची विस्तृत माहिती उपस्थितांना करून दिली. प्रा. अरूण जैन सरांनी आपल्या मनोगतात प्रताप शेठजी यांचे व्यक्तित्व विशेष, औद्योगिक, शैक्षणिक व अध्यात्मिक विचारांची झेप याविषयी अत्यंत रोचक अशी माहिती करून त्यांच्या जीवनकार्यातून आजच्या तरूण विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा अशी मनिषा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नाली महाजन व आभार प्रदर्शन प्रा. सुनिता चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *