कस्तुरीचा परिमळ, व्हॉइस आँफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी अजय भामरे यांनी लिहिलेली कविता
1 min read

कस्तुरीचा परिमळ, व्हॉइस आँफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी अजय भामरे यांनी लिहिलेली कविता

Loading

*कस्तुरीचा परिमळ*

‘कस्तुरी ‘चा सुगंध आज चौफेर दरवळतोय …….
विठ्ठला चा सुत माणुसकीचं नातं गुंफतोय……

सर, तुम्ही पत्रकारितेचा
वसा सदैव जपून ठेवलाय…
‘व्हॉईस ‘चे एक फूल बनून फुलपंखी फुलपाखरांचा
कारवा घेऊन चाललात…….

मंगळ तेजस्वी ग्रह,
त्या ताऱ्यागत ,
उजेड तेवत ठेवलाय…….
एक दिलाने समानतेचा
पुल बांधलाय…..

माणसापरी माणुसकीचे
सदैव हृदयात भाव दिसतात…
दातृत्वाच्या भावनेतून
नेहमीच माणुसकीचे दर्शन घडवतात…. ..

आज स्वप्नाहून सुंदर
‘व्हॉइस मीडिया’चा सूर
महाराष्ट्रभर गुंजतोय……
खान्देश चा हा अनमोल हिरा
‘मंगलसूर ‘समुद्रापार छेडतोय……२

नेतृत्व -दातृत्व- कर्तृत्वाचा
त्रिवेणी संगम असलेले ,
सर, तुमचे व्यक्तिमत्व …
हृदयात माणसांप्रती
नेहमीच दिसते ममत्व…..
मन निर्मळ अन् स्वभाव प्रेमळ
दरवळतोय चौफेर कस्तुरीचा
सुगंधमय परिमळ……
दरवळतोय चौफेर कस्तुरीचा
सुगंधमय परिमळ……

आदरणीय श्री डिगंबर महाले सरांना जन्मदिवसाच्या ‘मंगल ‘मय शुभेच्छा

*कवी: अजय भामरे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *