इंडीयन मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर! अध्यक्षपदी डॉ. महेंद्र मढवी तर सचिव पदी डॉ. मोहददीस मोमीन यांची निवड…
![]()
इंडीयन मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर!
अध्यक्षपदी डॉ. महेंद्र मढवी तर सचिव पदी डॉ.
मोहददीस मोमीन यांची निवड…
ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA)भिवंडी शाखेची सन (2024 ते 2026) या दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारणीची निवड रविवार दिनांक 1/12/2024 रोजी 3/6/2012 साली उद्घाटन झालेल्या सुसज्ज अशा इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA)सभागृह सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स दुसरा मजला टेमघर कल्याण रोड येथे शेकडो सभासदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी डॉ.श्री. महेंद्र महादेव मढवी,सचिव पदी डॉ.श्री.
मोहददीस मोमीन, तर खजिनदार पदी डॉ.श्री.गुलाम. एम.मारफानी यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या विशेष वार्षिक बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.श्री.संतोष कदम,भिवंडी लोकसभेचे खासदार श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा,आयपीएस अधिकारी तथा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई डॉ.श्री. रवींद्र शिसवे,
आदी मान्यवर व मोठ्या संख्येने इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखेचे पदाधिकाऱी उपस्थित होते.इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखेचे
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.श्री. महेंद्र महादेव मढवी,सचिव डॉ.श्री.
मोहददीस मोमीन, तर खजिनदार डॉ.श्री.गुलाम. एम.मारफानी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की,तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला या सर्वांनी बिनविरोध निवडून दिले आहे, यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम तुम्ही करावे जेणेकरून तुमचा सर्वांना अभिमान वाटेल.

सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो.कारण
तुमच्या सर्वाच्या सहकार्यामुळेच आम्ही पदाधिकारी म्हणून अध्यक्ष,सचिव व खजिनदार या पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना सोबत घेऊन आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.श्री. महेंद्र महादेव मढवी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.या संपुर्ण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिका अन्सारी व डॉ.गुलाम मारफानी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.श्री.झकी बेलारी यांनी केले.

