सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर
1 min read

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

Loading

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

:अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुनील इंगळे यांनी विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल जॉय ऑफ गिविंग संस्थेने घेऊन त्यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर केला त्यांनी गेली 34 वर्षापासून विविध सामाजिक संस्थेमधून आपला समाजसेवेचा वसा जपला आहे. लेवा सेवा मंडळे, जायंन्ट्स इंटरनॅशनल ग्रुप,उल्हासनगर वेल्फेअर असोसिएशन, जनजागृती सेवा संस्था, प्रेरणा फाउंडेशन, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद अशा विविध समाजसेवा संस्थांमध्ये आपला ठसा उमटवला यासोबत खानदेश कन्या निसर्ग कन्या कै.बहिणाबाई चौधरी च्या काव्याचा प्रसार करण्यासाठी बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली या सोबतच स्वतः देहदानाचे महत्त्व जाणून व पत्नीसह नेत्रदानाचा संकल्प केला आहे.पत्रकारिता मध्येही सहभाग घेऊन सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडून सामाजिक जागृती करीत असतात. आजपर्यंत त्यांना 54 राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विचार करूनच आदर्श समाजसेवा पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *